नास्तिक म्हणजे कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे...
या मेळाव्यात आम्ही आस्तिकांपेक्षा खूप शहाणे, असा कोणताही अभिनिवेष नसतो. व्यक्ती नास्तिक असणे म्हणजे ती कोणी अनैतिक, पापी, दुर्जन व्यक्ती असेल, या गैरसमजाला कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. व्यक्ती नास्तिक आहे म्हणजे नक्की काय? या जगावर आणि या जगातला एक घटक म्हणून तिच्यावर कोण्या दैवी शक्तीचे नियंत्रण आहे, आणि ती दैवी शक्ती व्यक्तीच्या आयुष्यात चांगले-वाईट बदल घडवू शकते, हे ती व्यक्ती नाकारते.......